नित्यनिरंजनावधूत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, बोरणे - ठोसेघर, सातारा

।। श्री स्वामी समर्थ ।।

दादा महाराज फौंडेशन (रजि क्र: एम . ए . एच . १२९६/१७)

www.swamisamarthdmf.com

स्वामींच्या कृपाशीर्वादाने, प. पू. दादा महाराज यांच्या प्रेरणेने तसेच श्री.विजय महाराज इंगवले (माउलीं) यांच्या मार्गदर्शनाखाली बोरणे, सातारा येथील नियोजित नित्यनिरंजनावधूत मठाचे सेवाकार्य आपल्या सर्वांच्या सहभागातून सुरू आहे. स्वामी महाराज चैतन्य रूपाने तिथे आहेतच याची अनुभूती आपल्या सर्वांना आहे पण माउलींनी सांगितल्याप्रमाणे आपले स्वामी लवकरच मूर्ती रूपाने आपल्या प्रति अक्कलकोट बोरणे मठात येणार आहेत. मागील दोन ते तीन महिने मठाचे बांधकाम स्वामींच्या कृपेने सुरू आहे.

माऊली नेहमी म्हणतात की, सेवा कोणतीही असो ती नेहमी सर्वांनी मिळून करावी. प्रत्येकाला सेवेची संधी द्यावी कारण स्वामी सेवेतून सर्वांचे कल्याणच होते.स्वामींच्या या कार्यात त्यांनी आपली सेवेकरी भक्त म्हणून निवड केली आहे हे आपले परमभाग्य आहे. त्यामुळे आपल्या स्वामींची सेवा हे आपल्या सर्वांचे परमकर्तव्य आहे. कोणतीच सेवा ही लहान किंवा मोठी नसते , कारण सेवा ही सेवाच असते. सेवा ही कोणतीही असो फक्त ती मनापासून व पूर्ण श्रद्धेने असायला हवी, प्रत्येक सेवेमध्ये आपला खारीचा वाटा असायला हवा.आपले स्वामी मूर्ती रूपाने बोरणे मठात येण्यासाठी सज्ज झाले आहेत व त्यांनी तिथे येण्यासाठी सर्व बांधकाम सेवा पूर्ण होणं देखील गरजेचं आहे.जागा खरेदी झाल्यापासून ते आत्तार्यंत विट बांधकाम पर्यंतची सेवा महाराजांनी पूर्ण करून घेतली आहे आणि इथून पुढे प्लास्टर, फरशी बसवणे, खिडकी-दरवाजे बसवणे असे बरेच काम बाकी राहिले आहे व त्याचा खर्चही मोठा आहे. स्वामी चरणी आपली सेवा रुजू करण्याची एक संधी उपलब्ध झाली आहे.सदर सेवेमध्ये आपल्या सर्व सेवेकऱ्यांचा सहभाग महत्वाचा आहे त्यामुळे शक्य असेल त्याप्रमाणे प्रत्येकाने सेवेत सहभागी होऊन या संधीचं सोनं करावं.

आपल्याला इथून पुढे राहिलेले जे काम करायचे आहे व त्यासाठी येणारा खर्च याचा तपशील खाली दिलेला आहे:-

१) बाहेरील प्लास्टर मटेरियल सेवा:- ₹ ३७,५००
२) प्लास्टर कामगार सेवा:- ₹ ५४,०००
३) ध्यानमंदिर फरशी सेवा:- ₹ ३१,४००
४) व्हरांडा फरशी सेवा:- ₹ १७,९००
५) गुरुनिवास फरशी सेवा:- ₹ १३,०००
६) बाथरूम फरशी सेवा:- ₹ २६,४००
७) टॉयलेट फरशी सेवा:- ₹ १२,२००
८) पॅसेज फरशी सेवा:- ₹ ८,०००
९) खिडकी सेवा:- ₹ २१,४००
१०) दरवाजा सेवा:-
     a) ध्यानमंदिर दरवाजा:- ₹ १६,०००
     b) गुरूनिवास दरवाजा सेवा:- ₹ १२,०००
     c) बाथरूम व टॉयलेट दरवाजा सेवा:- ₹ १०,५००

११) लाईट सेवा:- ₹ ४५,०००
१२) अन्नछत्र बांधकाम सेवा:- ₹ २५,६५०
१३) अन्नछत्र प्लास्टर सेवा:- ₹ ५३,०००
१४) अन्नछत्र पत्रा सेवा:- ₹ १८,५००
१५) अन्नछत्र दरवाजा सेवा:- ₹ ११,२००
१६) अन्नछत्र खिडकी सेवा:- ₹ ३,१००
१७) ध्यानमंदिर जिप्सम प्लास्टर सेवा:- ₹ २०,०००
१८) ध्यानमंदिर सिलींग पी.ओ.पी. सेवा:- ₹ १७,५००
१९) गुरुनिवास जिप्सम प्लास्टर सेवा:- ₹ १०,५००
२०) गुरुनिवास सिलींग पी.ओ.पी. सेवा:- ₹ १०,०००

वरील कोणत्याही सेवेमध्ये एकट्याने किंवा एकत्र मिळून आपल्याला जसं शक्य आहे तसं सहभागी होता येईल, यामध्ये कोणतंही बंधन नाही. वरील प्रत्येक सेवेची आपल्याला दादा महाराज फौंडेशन तर्फे रितसर पावती देण्यात येईल. खालील पद्धतीने सेवेत सहभागी होता येईल:-

१) Google Pay / Phone Pay :-
मो. नं.:- 7249491206

माहिती व संपर्कासाठी:-
9822737707 / 7249491206

Foundation Bank Details :
Dada Maharaj Foundation | दादा महाराज फौंडेशन
Axis Bank,
Ac. No.920010065341724,
IFSC Code: UTIB0004520,
Branch: Datta Mandir Road, Wakad, Pune.
QRCODE-Dada-Maharaj-Foundation

चला तर मग सर्वजण मिळून आपल्या स्वामींनी दिलेल्या सेवेच्या संधीचं सोनं करूयात, जमेल तसा आपल्यापरीने खारीचा वाटा उचलूयात...

स्वामी ओम